जिव्हाळा संस्था “इंटरनॅशनल आयकॉन 2020” पुरस्कारा ने सन्मानित
जिव्हाळा संस्था “इंटरनॅशनल आयकॉन 2020” पुरस्कारा ने सन्मानित
जिव्हाळा बहु. संस्था,उमरखेड जि. यवतमाळ महाराष्ट्र या संस्थेला नुकताच इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार 2020 नॅशनल अँटी हरासमेंट फॉऊंडेशन, भारत व ESO मध्यप्रदेश, भारत यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक क्षेत्रा मध्ये मागील ८ वर्षा पासून महाराष्ट्रातील यवतमाळ, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून संस्थेच्या कार्याची सुरवात झाली आहे. महिला स्वयं सहायता समूह , स्वागत स्त्री जन्माचे (लेक वाचवा, लेक वाढवा, लेक शिकवा ), आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास प्रशिक्षण, लघु उद्योग प्रशिक्षण, वृक्ष लागवड व संवर्धन, व्यसन मुक्ती अभियान, एड्स जनजागृती, समाज प्रबोधन, जनजागृती कार्यक्रम, पर्यावरण, शेती, सेंदीय शेती ( शिवांश काम्पोष्ट खत ) , मानवी हक्क, बालहक्क, बेरोजगारी, शास्वत ग्रामविकास , सिंचन, पाणलोट क्षेत्र, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियाना च्या माध्यमातून उमरखेड तालुक्यातील सात तलावातून गाळ उत्खनन करून शेतकरी बांधवाना मोफत गाळ वाटप केला आहे. त्या उत्खनना मुळे आज शेकडो लिटर जल साठा होऊन दुष्काळावर मात करण्यात संस्थेला फार मोठे यश प्राप्त झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात या अभियानात भरीव कार्यामुळे जिव्हाळा संस्था प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली आहे. समाजातील सर्व उपेक्षित घटकांसाठी अहोरात्र कार्य करणारी निस्वार्थ संस्था म्हणून नावलौकिक मिळविला आहे. या सर्व विविध मुद्यांवर संस्था सातत्याने कार्य करत आहे जिव्हाळा संस्थेचे अध्यक्ष अतुल भाऊ मादावार मागील १९ वर्षा पासून या सर्व मुद्यांवर अविरत उलेखनीय कार्य करीत आहेत. या सर्व सामाजिक उलेखनीय कार्याची दखल घेऊन हा आंतरराष्ट्रीय प्रतिष्टीत पुरस्कार 2020 हा मानाचा सन्मान 22 फेब्रुवारी 2020 ला विराट रिसोर्ट & हॉटेल इंदौर मध्यप्रदेश येथे स्पेशल गेस्ट जेष्ठ समाज सेवक पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, बॉलिवूड सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सुस्मिता मुखर्जी, कत्तार देशाचे इंटरनॅशनल गेस्ट श्री. एम. एस. बुखारी, सुप्रसिद्ध कॉमेडीयन श्री. उदय धहिया, नॅशनल प्रेसिडेंट शुभम चौरसिया, नॅशनल अँटी हरासमेंट फॉऊंडेशन, भारत च्या अध्यक्षा प्रतिभा वाईकर , नॅशनल अँटी हरासमेंट फॉऊंडेशन च्या सचिव विद्या चौरसिया, नॅशनल सेक्रेटरी सुनील सोन्हीया, उमेश चाफे, प्रज्ञा कांबळे, विकास महाजन , श्रद्धा मालवणकर या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते सुवर्ण पदक, प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह या स्वरुपात मोठ्या दिमाखदार सोहळयात जिव्हाळा संस्थेस हा आंतरराष्ट्रीय मानाचा इंटरनॅशनल आयकॉन अवार्ड 2020 प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर संस्थेच्या जनहितार्थ कार्याची दखल घेतली आहे. यामुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यावेळी जिव्हाळा संस्थेचे अध्यक्ष अतुलभाऊ मादावार व संस्थेच्या सलागार सौ. संगीताताई अतुल मादावार हे उपस्थित होते. या पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी देश विदेशातून विविध क्षेत्रात पारंगत असलेल्या मान्यवरांचा पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. यावेळी संस्थे अध्यक्ष अतुल भाऊ मादावार यांनी आपल्या भाषणातून संस्थे च्या कार्याला उजाळा देत विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात हा आंतरराष्ट्रीय मानाचा सन्मान प्रथमच जिव्हाळा संस्थेस प्रदान केला त्या बद्दल नॅशनल अँटी हरासमेंट फॉऊंडेशन, भारत व ESO मध्यप्रदेश, भारत चे शतशः आभार मानले तसेच ते म्हणाले कि, आज हा पुरस्कार मिळाला त्याचे सर्व श्रेय संस्थे चे सर्व कार्यकारिणी सदस्य, स्वयंसेवक , सलागार, मार्गदर्शक, सर्व पत्रकार बांधव व संस्थे शी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निगडीत असनाऱ्या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शना चे व मेहनती चे फळ आहे असे ते म्हणाले या कार्यक्रमा चे संचलन सुरभी शर्मा यांनी केले तर आभार शुभम चौरसिया यांनी मानले.